डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण

नागपूर : उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातील ब्लॉक क्रमांक १३ मध्ये राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे लोकप्रिय आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या शुभहस्ते सकाळी सुगत नगर येथील सुगत बुद्ध विहार परिसरातील वाचनालयाचे बांधकाम ९.१३ लक्ष रुपयात आणि कामगार नगर येथील गौसिया मस्जिद परिसरातील सौंदर्यकरण ११.७६ लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी प्रभात कॉलनी मैत्री बुद्ध विहार परिसरातील सौंदर्यकरण १२.९० लक्ष कामाचे, नारी रोड येथील सम्यक बुद्ध विहारातील ३१.०२ लक्षच्या स्वछतागृह व शेडचे आणि आवळे नगर येथील प्रियदर्शी सम्राट अशोक बुद्ध विहारच्या पहिल्या माळ्यावरील ३२.७८ लक्षने निर्मित वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेम्भूर्णे, भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, ब्लॉक क्र.१३ चे अध्यक्ष सुरेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रसंगी हिराताई गेडाम, नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, धिरेंद्र चहांदे, कल्पनाताई द्रोणकर, उमेश बोरकर, दिवाकर साखरे, शंकर ढेंगरे, सतीश पाली, भारती सहारे, विजयाताई हजारे, संगीता पाटील, रेखा लांजेवार, सिद्धार्थ गेडाम, राकेश इखार, मोहीन सिद्धीकी, विरागणं दरवाडे, खोब्रागडे, खांडेकर, वर्षा शामकुळे, निशाद इंदूरकर, सप्तऋषी लांजेवार, चंपावती धनविजय, डॉ. कांबळे, मनोहर दुपारेसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.