भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन

पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दीर्घ आजाराने निधन (Death) झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात (Denanath Hospital) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजकीय कारकीर्द…

टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांनी १९७३ मध्ये ट्रेड युनियनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 1983 मध्ये ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1993 मध्ये झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव झाला.त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. 1995 पासून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून सलग पाच आमदार जिंकले होते. राज्य मंत्रिमंडळातील अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानंतर 2019 मध्ये ते पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आले होते.