PF इंटरेस्ट रेट वाढल्यावर किती मिळणार व्याज? वाचा सविस्तर…

EPF व्याज दर कसा मोजायचा?

नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टने पीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला भविष्य निर्वाह निधीवर अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे ईपीएफ सदस्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी, CBT ने EPF 40 वर्षांतील सर्वकालीन नीचांकावर आणला. तथापि, आर्थिक वर्ष 2018-19 मधील 8.55 टक्केच्या तुलनेत व्याजदर अजूनही कमी आहे.

लक्षात ठेवा, कर्मचार्‍यांचे पीएफ योगदान त्यांच्या EPF खात्यात मासिक आधारावर जमा केले जाते आणि व्याज दरमहा मोजले जाते. परंतु एकूण व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. दरम्यान, एपीएफओच्या या दिलासादायक निर्णयानंतर, आता तुम्ही तुमचा ईपीएफ व्याजदर कसा मोजाल ते तपशीलवार जाणून घेऊया. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच EPFO व्याजदरात बदल करते.

आवश्यक तपशील –

– कर्मचाऱ्याचे सध्याचे वय.
– वर्तमान EPF शिल्लक.
– मासिक मूलभूत आणि कमाल रु. १५ हजारपर्यंत महागाई भत्ता.
– EPF मध्ये योगदानाची टक्केवारी.
– निवृत्तीचे वय.

EPF व्याज दर कसा मोजायचा?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 45 हजार आणि व्यक्ती एप्रिल 2022 मध्ये कंपनीत सामील झाल्यास, त्याचे PF व्याज खालीलप्रमाणे मोजले जाईल :

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १५ हजार रुपयापेक्षा जास्त असेल, तर १ हजार २५० रुपये EPS खात्यात हस्तांतरित केले जातात. म्हणजे ४५ हजार रुपयापैकी ८.१५ टक्के दराने ३ हजार ६६७ होते आणि १ हजार २५० रुपये वजा केल्यावर उर्वरित रक्कम EPF खात्यात हस्तांतरित केली जाईल. जर EPF व्याज दर ८.१५ टक्के असेल तर मासिक आधारावर ०.००६७५% (अंदाजे) व्याजदर आकारला जाण्याची शक्यता आहे.