प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करा – किशोर जोरगेवार

परिवहन विभागाच्या अधिका-यांशी बैठक, अधिकाऱ्यांना सुचना

चंद्रपूर : चंद्रपूर मतदार संघातील महत्वाच्या ठिकाणी बस थांबा शेडचे निर्माण करावे, जिल्हातील सर्व बस स्थानकामध्ये महिलांकरिता शौचालय निर्माण करावे, बस स्थानकांमधील काही भागामध्ये दिव्यांग आणि महिलांना दुकानांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही असे शुक्ष्म नियोजन करा, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहण विभागाच्या अधिका-यांना केल्या आहे.

परिवहन विभागाच्या विविध समस्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सदर सूचना केल्या आहे. या बैठकीला परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक सुतावणे, राहुल मोडक उपस्थित होते.

यांत्रिकी विभागात अनेक पदे रिक्त आहे. ती भरण्यात यावी, वढा यात्रे दरम्यान अतिरिक्त बस सोडण्यात याव्यात, एस.टी महामंडळ मधिल उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, सुचना फलक आणि बसेसच्या वेळपत्रकाची माहिती फलक लावण्यात यावे आदी सूचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन विभागाच्या अधिका-यांना केल्या. चंद्रपूर आणि घूग्घूस बसस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले आहे.