28 रोजी चंद्रपुरात मुसळधार पाऊस येणार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक २८ जून रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक २९ ते ३० जून रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये पुढील पाच दिवसात २८ जून ते ०२ जुलै २०२३ रोजी आकाश ढगाळ राहून कमाल तापमान २८.६ ते ३०.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.४ ते २२.७ अंश सेल्सिअस राहून दिनांक २८ ते २९ जून रोजी सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.

तसेच दिनांक ३० जून ते ०२ जुलै रोजी विरळ/काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.