हवामान विभागाचा राज्यात 2 दिवस पावसाचा इशारा.

West Bengal
West Bengal

विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता.

नागपूर (Nagpur) : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आगामी 2 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. विदर्भात त्याचा जोर अधिक राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटरवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण झाले आहे. यापूर्वी 15 सप्टेंबरनंतर मध्य प्रदेशात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकले आहे. परिणामी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पण आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वातावरणातील बदलामुळे विदर्भात मध्यम ते जोरदार, कोकणात ठरावीक ठिकाणी जोरदार, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज आहे.