विश्वचषकापूर्वी नंबर-1 बनू शकेल का भारत?

Team India
Team India

प्रथमच एकाच वेळी सर्व फॉरमॅटच्या क्रमवारीत अव्वल येण्याची संधी.

मुंबई (Mumbai) : भारताला जगातील नंबर 1 वनडे संघ म्हणून विश्वचषकात उतरण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया हे यश मिळवू शकते. कांगारूंविरुद्धची मालिका जिंकताच टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनेल.

या स्थितीत एकाच वेळी सर्व फॉरमॅटमध्ये क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरेल. 2014 मध्ये आतापर्यंत केवळ दक्षिण आफ्रिकेलाच हे स्थान मिळवता आले आहे.

भारताने मालिका जिंकल्यास तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 कसा होणार?

सध्याच्या क्रमवारीत भारतीय संघ कसोटी आणि टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, पण वनडेमध्ये संघ 115 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही केवळ 115 गुण आहेत.

टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले तर संघ 116 गुणांसह वनडेत नंबर 1 बनेल. स्ट्रेलियावर 3-0 ने क्लीन स्वीप केल्यास, भारत 118 गुणांसह एकदिवसीय मुकुट जिंकेल.