नागपूर जवळील बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर.
नागपूर.

नागपूर (Nagpur) दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या (Solar Industries India Limited) परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केली.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.