उद्या टेकडी उड्डाणपूल पाडायला सुरुवात होणार

नागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे कार्य उद्या दिनांक 19 जुलै 2023 (बुधवार) पासून सुरू होणार महा मेट्रोच्या वतीने या संदर्भात सर्व प्रकारची तयार करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे कि, उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामी करून स्थलांतरित केल्या गेली आहे. नागपूर महानगरपालिकेने उड्डाणपूल बांधकाम पाडण्यास महा मेट्रोला परवानगी प्रदान केल्या गेली आहे.

उड्डाणपूल पाडताना नागरिकांना कुठ्याही प्रकारचं त्रास होऊन नये तसेच येण्या जाण्याच्या मार्गाकरिता योग्य ते फलक मेट्रोच्या वतीने लावण्यात आले आहे तसेच याठिकाणी महा मेट्रो द्वारे सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्या गेली आहे. नागपूर पोलिस, वाहतूक विभागाशी समन्वय साधून महा मेट्रोने योग्य त्या उपायोजना केल्या आहेत.

ट्रॅफिक प्लॅन पुढील प्रमाणे :
• सेंट्रल एव्हेन्यूकडून एलआयसी किंवा आरबीआय चौककडे जाणारी वाहतूक आणि त्याउलट, वाहतूक पूर्वी प्रमाणे कार्यरत असेल.
• एलआयसी किंवा आरबीआय चौककडून सेंट्रल एव्हेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतूकी मध्ये देखील कुठलाही बदल करण्यात आला नाही.
• सेंट्रल एव्हेन्यू येथुन प्रवास करणार्यां ना आणि रेल्वे स्थानकाकडे जायचे आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच डावीकडे वळण घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचावे लागेल.
• उड्डाणपुलावरून जयस्तंभ चौक आणि मानस चौक कडे जाण्यास बंदी असेल.