हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर : 2023 साली हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस देण्यात येणार आहे. तरी सर्व हज यात्रेकरूंनी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या एन.सी.डी. ओपीडी येथे शिबीराचे दिवशी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.