बल्लारपूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाचे बाजारीकरण होऊ देणार नाही; ‘आप’ची आक्रमक भूमिका

चंद्रपूर : या सत्रात बल्लारपूर नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत. मात्र या शाळांच्या व्यवस्थापनाचा ठेका खासगी शिक्षण संस्था मालकाला देण्यात आला आहे. प्रत्येक वर्गात फक्त 10 लकी ड्रॉ बीपीएल मुलांना मोफत प्रवेश मिळेल आणि इतरांना वार्षिक 3500 रुपये शुल्क भरावे लागेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयावर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

यासोबतच आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन देऊन खासगी कंपनी चालकाला दिलेले कंत्राट रद्द करून मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन शिक्षण नगरपरिषदेच्या माध्यमातून दिले. नगरपरिषदेने ४८ तासांत याबाबत योग्य ती पावले न उचलल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला.

यावेळेस जिल्हा संघटनमंत्री नागेश्वर गंडलेवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सय्यद अफजल अली, सचिव ज्योतिताई बाबरे, शहर संघठनमंत्री रोहित जंगमवार, शहर प्रवक्ता आसिफ शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, युथ अध्यक्ष सागर कांबळे, बेबीताई बुरडकर, पप्पू श्रीवास्तव, अलिना शेख, महेंद्र चूनारकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.