निकालाची प्रतीक्षा संपली; CBSE दहावी बारावी परीक्षेचा निकाल घोषित

नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. CBSE ने 12वी पाठोपाठ 10वी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीच्या निकालात केरळमधील त्रिवेंद्रमने अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल cbseresults.nic.in आणि cbse.nic.in वर पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.

असा पाहा निकाल

– निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.gov.in वर जा.
– इथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE दहावी निकाल 2023 लिंक वर.
– नवीन पेज ओपन होईल. उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील एन्टर करावे लागतील.
– रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील एन्टर करा आणि सबमिट बटण दाबा.
– असे केल्यास निकाल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतील.
– इथे निकाल चेक करा, डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.