भिवसेनखोरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गुरूवारी १० ऑगस्ट रोजी धरमपेठ झाोन अंतर्गत भिवसनखोरी, भिमसेन नगर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

केंद्र शासनाकडून १५व्या वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष २०२२-२३ करीता २० आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झााली आहे. त्याअंतर्गत भिवसन खोरी, भिमसेन नगर आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

भिवसेनखोरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी लाभार्थ्यांना वेळीच सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची सूचना केली. तसेच आरोग्यविषयक सर्व योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचतील, याचा पाठपूरावा करण्याबाबत सूचित केले.

मनपातर्फे आतापर्यंत एकूण ७ आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरूवात झाालेली आहे. यामध्ये गोरले ले-आउट येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच रहाटे टोली येथे रहाटे नगर (रामटेके नगर) आरोग्यवर्धिनी केंद्र, श्यामनगर (भवानी नगर), रोज नगर, नागोबा मंदिर (न्यु म्हाळगी नगर), बाबा दिप सिंग नगर (समता नगर पूल), मनिष नगर (कृषी नारा सोसायटी) व आता भिवसन खोरी (भिमसेन नगर) येथे आठव्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा निःशुल्क पुरविल्या जाणार आहेत. तसेच माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोफत दिल्या जातील.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी प्रास्ताविक केले. लोकार्पणप्रसंगी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, झाोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. देवस्थळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाणी, डॉ. अश्विनी निकम, निलेश बाभरे, डॉ. राजेश बुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारीपहाड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.