मनपाच्या सेल्फी पॉईंटवर नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरात ७५ ठिकाणी सेल्फी पॉईंटची व्यवस्था

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात माझी माती माझा देश उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरात ७५ ठिकाणी सेल्फी पॉईंट/स्टँड उभारण्यात आले आहे. या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियानामध्ये पाच उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिलाफलकम, पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, ध्वजारोहन आणि राष्ट्रगीत या पाच तत्वांवर कार्य केले जात आहेत. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे हातात माती किंवा मातीचा दिवा घेउन पंच प्रण प्रतिज्ञा घेताना सेल्फी घ्यायचा. हा सेल्फी केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र प्राप्त केले जात आहे. शहरात ७५ विविध ठिकाणी असे सेल्फी स्टँड उभारण्यात आले आहेत.

याशिवाय पूर्व नागपुरात आंबेडकर उद्यान, पश्चिम नागपुरात फुटाळा तलाव, दक्षिण-पश्चिम नागपुरातील विवेकानंद स्मारक अंबाझरी, एअर फोर्स, अमर जवान स्मारक अजनी चौक, दक्षिण नागपुरातील रेशीमबाग, मध्य नागपुरातील चिटणीस पार्क स्टेडियम, उत्तर नागपुरातील जरीपटका उद्यान या प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.

नागरिकांनी आपल्या नजीकच्या सेल्फी पॉईंट स्थळी भेट देउन सेल्फी काढावा आणि तो केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


मनपाच्या सेल्फी स्पर्धेत सहभागी व्हाजिंका आकर्षक बक्षीस

माझी माती माझा देश अभियानाच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे १५ ऑगस्ट रोजी विशेष सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७५ वर्षावरील वयोगट, १७ ते ७४ वर्षे, १० वर्षाखालील मुले आणि मुली या वयोगटासह कुटुंबासोबत सेल्फी या चार गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणा-या विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेत कसे होणार सहभागी?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया आहे. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरात विविध भागांमध्ये ७५ सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी हातात माती किंवा दिवा घेउन सेल्फी काढायची. हा सेल्फी केंद्र शासनाच्या https://merimaatimeradesh.gov.in/ या संकेतस्थळावर Take Pledge वर क्लिक करून नाव, मोबाईल क्रमांक, राज्य, जिल्हा नोंदवून पुढे आपला सेल्फी अपलोड करायचा. यानंतर ई-प्रमाणपत्र येईल. तो डाउनलोड करायचा. सेल्फी पॉईंटस्थळी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा वरील प्रक्रिया करता येईल.

यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या https://nmcnagpur.gov.in/merimati/ या संकेतस्थळावर क्लिक करायेथे नावमोबाईल क्रमांकजन्म तारीखपत्ता नोंदवूनकेंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड केलेला सेल्फी आणि प्राप्त प्रमाणपत्र अपलोड करायचामनपाला प्राप्त सेल्फींचे परीक्षण करून परीक्षकांकडून निर्णय घेण्यात येईल.