11 ऑगस्ट रोजी क्रेडीट आऊटरीच शिबिराचे आयोजन

चंद्रपूर : राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे च्या निर्देशानुसार राज्यभर 1 जुलै ते 30 सप्टेंबर या दरम्यान क्रेडीट आऊटरीच शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या 118 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना, कर्जदारांना तसेच नवीन अर्जदारांना बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात येईल. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी केले आहे.