9 ऑगस्ट क्रांती शहीद दिनानिमित्त नागपूर, महानगरपालिकेद्वारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशासाठी शहिद झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अभिवादन करण्यात आले. फ्रिडम पार्क शहिद स्मारक येथे नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरक्ति आयुक्त न‍िर्भय जैन यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाह‍िली.

यावेळी माजी आमदार आणि स्मारक समितीचे प्रमुख  यादवराव देवगडे दीनानाथ पडोळे, माजी  विपक्ष नेता मनपा  तानाजी वनवे, लीलाताई चितळे, संतोष खोब्रागडे, रघुवीर देवगडे, संजय गुप्ता, दिलीप धोटे, मिलिंद माकडे, विनोद दरोडी, जिल्हा माहिती अध‍िकारी प्रव‍िण टाके, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सहायक अधिक्षक राजकुमार मेश्राम, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, अग्निशमन दलाचे जवान इत्यादी उपस्थित होते. तसेच 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त नागपूर, महानगरपालिकेद्वारे शहीद स्तंभ चौक इतवारी तसेच कॉटन मार्केट येथील शहीद स्मारकास पुष्प्‍चक्र अर्पण करून नागपूर नगरीतर्फे हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी माजी महापौर, दयाशंकर तिवारी, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर तसेच अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.