अनुराग शर्मा यांनी केला महा कार्डचा सर्वाधिक उपयोग 

 महा मेट्रो द्वारे करण्यात आला सत्कार

नागपूर  : देशात सर्व स्तरांवर कॅशलेस पेमेंटवर सातत्याने भर दिला जात असताना, नागपूर मेट्रोचे कॉमन मोबिलिटी कार्ड असलेले महा कार्डच्या वापरात ही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मे २०२३ मध्ये सर्वाधिक वापर करून मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी श्री अनुराग शर्मा सर्वात जास्ती मेट्रो ने प्रवास केला. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्मचारी श्री शर्मा यांचा महा मेट्रो द्वारे सत्कार करण्यात आला.

मुख्य म्हणजे महाकार्डचा वापर वाढवण्यासाठी आणि तिकीट-संबंधित व्यवहारांसाठी रोखीचा वापर टाळण्यासाठी, महा मेट्रोने लकी ड्रॉ प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार दर महिन्याला सोडत काढण्यात येत असून एका महिन्यात जास्तीत जास्त महा कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिल्या जाते

महा मेट्रो नेहमीच प्रवाश्याना कॅशलेस पेमेंटचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहित करत असून महाकार्ड व्यतिरिक्त, महा मेट्रो ऍपचा जास्तीत जास्त उपयोग करण्यास प्रोत्साहित करते. क्यूआर (QR) कोड वापरून अँप डाउनलोड केले जाऊ शकते आणि योग्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर प्रवासी भाडे दिले जाऊ शकते. पेमेंटसाठी महाकार्ड किंवा अॅपचा वापर केवळ डिजिटल पेमेंटला चालना देण्यास उपयुक्त असून याद्वारे रोख व्यवहार ताळता येईल व मेट्रो ट्रेनच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होईल.

महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते.

महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे. आता या सोबत महा कार्ड मोफत मिळणार असल्याने या सोयीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा हे आवाहन नागपूरमेट्रोने केले आहे.