मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील स्वच्छता दूत असणाऱ्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ५ जुलै रोजी मनपाच्या 8 झोन निहाय विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. जवळपास 469 सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

घराची परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. अशातच शहराची स्वच्छता राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी नित्यनियमाने पार पाडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अर्थात सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मनपा आरोग्य विभागाद्वारे सफाई कर्मचाऱ्यांकरिता हे आरोग्य तपासणी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी घेतल्या जाणार असून, ५ जुलै रोजी मनपाच्या 8 झोन मध्ये हे शिबिर घेण्यात आले.

यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत तात्या टोपे हजेरी स्टॅन्ड, धरमपेठ झोन अंतर्गत नीम पार्क फ्रेंड्स कॉलनी, हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वर UPHC, धंतोली झोन अंतर्गत मॉडर्न मिल चौक, नेहरूनगर झोन अंतर्गत दर्शन कॉलनी वाठोडा दहन घाट, गांधीबाग झोन अंतर्गत युनानी दवाखाना, सतरंजीपुरा झोनअंतर्गत आदिवासी कॉलनी हजेरी स्टॅन्ड, लकगडगंज झोन प्रगत भवानी मंदिर कळमना कामठी रोड येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 469 सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.