पद्मशाली समाजाच्यावतीने एसबीसीचे २ टक्के आरक्षण ५० टक्केच्या आत बसविण्यासाठी शासनाला निवेदन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्य व शहर पद्मशाली समाज व एसबीसी संघर्ष समीतीच्या वतीने जिल्ह्यधिकारीमार्फत शासनाला एसबीसीचे २ टक्के आरक्षण ५० टक्केच्या आत बसविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

प्रथम चंद्रपूर जिल्ह्य व शहर पद्मशाली समाज, विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना व एसबीसी संघर्ष समीतीच्या वतीने जिल्ह्यधिकारी विनय गौडा भाप्रसे यांचे स्वागत करण्यात आले. एसबीसी संघर्ष समितीच्या वतीने एसबीसीचे ५ टक्के आरक्षण ५० टक्केच्या आत बसविण्यासाठी न्यायालयाला कळविणे व विधिमंडळात मंजुर झाल्याप्रमाणे एससी, एसटीला मिळणाऱ्या सर्व सवलती जशास तसे लागू करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणा देण्यात येत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी व एसबीसीचे समस्या निकाली काढण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व एसबीसी संघर्ष समीती विदर्भ उपाध्यक्ष डॉ. बंडूभाऊ आकनुरवार व पद्मशाली समाज सल्लागार सुर्यकांत कुचनवार यांच्या नेतृत्वात कोषाध्यक्ष संतोष वासलवार, पदाधिकारी मोरेश्वर कुरेवार, युवामंच अध्यक्ष गितेश मुसनवार, समाजाचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर अल्लेवार, सचिव राजु यंगलवार,विदर्भ कर्मचारी संघटना सचिव शंकर गदेवतुलवार, संघटक तुळशीदास मारशेट्टीवार, मधुकर चिप्पावार व इतर समाजबांधवाच्या उपस्थितीत शासनाला निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

डॉ. बंडू आकनुरवार यांनी जिल्ह्यधिकारी महोदय व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.