मुनगंटीवार यांचा 6 व 7 ऑगस्ट रोजी चंद्रपूर दौरा

चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 6 व 7 ऑगस्‍ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता नागपूरहून चंद्रपूरकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन येथे कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे मा. पंतप्रधान यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे होणा-या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता नागपूरवरून चंद्रपूरकडे प्रयाण, रात्री 9.30 वाजता चंद्रपूर निवासस्थानी आगमन व मुक्काम.

 सोमवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जनसंपर्क स्थळ, चंद्रपूर कार्यालयात उपस्थिती. रात्री चंद्रपूर निवासस्थानी मुक्काम.