‘पौर्णिमा दिवसा’निमित्त रामदासपेठ परिसरात जनजागृती

एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने मंगळवारी रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग टी-पॉईंट परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शात पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. कल्पना बिल्डिंग परिसरामध्ये ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले.

जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, तुषार देशमुख, काजल पिल्ले यांनी जनजागृती केली. त्यांना मनपाचे भोलानाथ सहारे, सुधीर कपूर, उपेंद्र वालदे, गुरूमीत सिंग, अपूर्व डे, कमलेश ठक्कर, राधिका मित्तल आदींनी सहकार्य केले.