चांभार नाल्यात कोसळलेल्या इमारतस्थळी मनपाचे मदतकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोन अंतर्गत सुधा गल्ली चौक फारूक नगर, चिराग अली, टेका नाका येथे चांभार नाल्याच्या भिंतीवर बांधण्यात आलेली एक इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी (ता.१) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकाद्वा रे तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य करण्यात आले.

सुधा गल्ली चौक फारूक नगर चिराग अली टेका नाका येथे नाल्याच्या भिंतीवर निर्माण असलेली दुमजली (तळमजला+दोन) इमारत कोसळल्याची माहिती मनपाला श्री. इमरान यांच्याद्वारे फोनवरून मिळली. तात्काळ मनपाच्या सुगत नगर आणि गंजीपेठ अग्निशमन केंद्रातील पथकाने घटनास्थळ गाठले व मदतकार्य सुरू केले. मुश्ताक अहमद अंसारी, वय ६५ वर्षे यांचे हे दुमजली घर आहे. घरातील तळमजल्यावर (Ground Floor) लेडिज शॉप व कपड्याचा माल तर वरच्या माळ्यावर टी.व्ही. फ्रिज, कूलर सोफा आदी साहित्य होते.

इमारत कोसळत असल्याचे कळताच प्रसंगावधान दाखविल्याने कोणतिही जीवितहानी झाली नाही. या घटनेमध्ये घरामध्ये असलेले कपड्याचे अंदाचे १० लक्ष रुपयांचे कपड्याच्या थानाचे नुकसान झाल्याचे घरमालक मुश्ताक अहमद अंसारी यांच्याद्वारे सांगण्यात आले.

मनपाच्या अग्निशमन व आपात्कालीन विभागाचे श्री. मनोज पिंगळे, आशीनगर झोनचे कार्यकारी अभियंता श्री. पझारे, पाचपावली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस.बी. मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे मदतकार्य करण्यात आले.