प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

SSC Result 2023 : बारावीच्या निकालानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर निकाल कुठे आणि कसा तपासायचा? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. निकाल पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा पाहा निकाल

स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.